Share

‘शेतकरी मोर्चाला पब्लिसिटी स्टंट म्हणत शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आठवलेंनी माफी मागावी’

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल मुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मुंबईतील आंदोलन हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण मोदी काही शेतकरी विरोधी नाहीत. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ऐकून त्यानुसार काम देखील केलं गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं’, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट असं म्हणत रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायदा तातडीने रद्द व्हावा या दृष्टीने गेल्या साडे तीन महिन्यापासून आंदोलन सुरू केले. हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. भारत सरकार व शेतकरी नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या सर्व फेऱ्या हे निष्फळ ठरल्या आणि मोदी सरकार हा कृषी कायदा मागे घेण्यास तयार नाही असे चित्र निर्माण झालेले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शेतकरी मोर्चाला पब्लिसिटी स्टंट म्हणत शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे त्यामुळे रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!