मुंबई – परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबतच्या माहितीच्या निमित्ताने एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अनिल परब यांच्या सीआरझेड झोनमधील रिसॉर्टची माहिती ही शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांनीच पुरवल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. रामदार कदम यांचे पीए प्रसाद कर्वे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील संभाषण व्हायरल झाले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल परबांच्याविरोधात सर्व मटेरीयल हे रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेच्या स्थानिक नेत्यानं केला होता. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. महाराष्ट्र देशा या क्लिपची पुष्टी करत नाही. पण ज्या दोन ते तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांच्याविरोधात जी ईडीनं कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत.
एवढंच नाही तर प्रसाद कर्वे हा रामदास कदमांचा कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असंही दिसतंय.दरम्यान, रामदास कदम यांनी ही क्लिप आपली नसून, आपला आवाज वापरला जात असल्याचा दावा रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात होणार पंधराशे कोटींची कामे – छगन भुजबळ
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- अनिल देशमुखांसह परमवीर सिंहांचा पाय आणखी खोलात; दोघांच्याही अडचणी वाढल्या
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- ‘विश्वास नांगरे पाटलांवर आरोप करून बदनाम करत असाल तर रस्त्यावर उतरू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

