मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तसेच माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह या दोघांच्याही अडचणी आता वाढताना दिसत आहेत. परमवीर सिंह प्रकरणी एकीकडे चांदीवल आयोगाची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई सत्र न्यायालयाकडनं अनिल देशमुखांना समन्स जारी केला आहे.
परमवीर सिंह यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देखील परमवीर सिंग यांनी दिलेले नाही. त्यामुळे परमवीर सिंग यांना मेडिकल बोर्ड समोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासून नंतर सरकार निलंबनाची प्रक्रिया करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
दुसऱ्या बाजूला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडनं अनिल देशमुखांना समन्स जारी केली आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. ईडीची देशमुख तपसात सहकार्य करत नसल्यामुळे विशेष कोर्टात याचिका केली आहे. वारंवार समन्स बजावूनही देशमुख चौकशीला गैरहजर राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात होणार पंधराशे कोटींची कामे – छगन भुजबळ
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- ‘इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर..’, पंजाबमधील राजकीय घडामोडींवर शिवसेनेची भूमिका
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- ‘विश्वास नांगरे पाटलांवर आरोप करून बदनाम करत असाल तर रस्त्यावर उतरू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

