Share

राणेंना मानाचं पान,भाजपचं ‘संकल्प पत्र’ तयार करणाऱ्या समितीत समावेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजप पक्षाच्या चिन्हावर आणि एबी फॉर्मवर खासदारकी मिळविलेल्या खा.नारायण राणे यांना भाजप पक्षावर आणि भाजप सत्तेवर असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका नुकतीच जाहीर टीका केली होती. मात्र आता भाजपने राणेंची मनधरणी केल्याचं स्पष्ट झालंय. भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी पक्षाच्या विविध समित्यांची घोषणा केली. त्यात भाजपचं संकल्प पत्र तयार करणाऱ्या समितीमध्ये नारायण राणे यांचंही नाव आहे.

भाजपचे संकल्प पत्र म्हणजे निवडणुकीसाठीचा जाहीरनामा असतो. त्यामुळे या समितीत ज्येष्ठ आणि जाणकार नेत्यांचा समावेश केला जातो. त्यामुळं या समितीत राणे यांना स्थान देऊन भाजपने त्यांच्या बद्दल आदर दाखविल्याचं बोललं जाते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!