सिंधुदुर्ग : ‘मुक्या मुख्यमंत्र्यां’मुळे महाराष्ट्र राज्य अधोगतीकडे चालले आहे.’ अशी घणाघाती टीका भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासावर भाष्य न करता कोकणी जनतेची घोर निराशा केली आहे. असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर होते. मात्र वेळेअभावी त्यांना जनतेची संवाद साधता आला नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘मुक्या मुख्यमंत्र्यां’मुळे महाराष्ट्र राज्य अधोगतीकडे चालले आहे. ठाकरेंनी जनतेला दिलेली आश्वासने न पाळता सर्व कामांना स्थगिती देऊन मंत्रालयात भ्रष्टाचाराची दुकाने सरु केली आहेत. हे सरकार गेल्याशिवाय राज्यात चांगले दिवस येणार नाहीत.’ असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
तर उद्धव ठाकरेंचे कोकणच्या विकासाला काय योगदान आहे? असा सवालहि त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्री ज्या दौऱ्यावर जातात त्याठिकाणी विकासासाठी भरघोस निधी देऊन जातात, असा अलिखित नियम आहे. मात्र, राज्याचा मुका मुख्यमंत्री आंगणेवाडीत पाहुण्यासारखा आला आणि दर्शन घेऊन निघून गेला. मुख्यमंत्र्यांमध्ये पैसे काढून देण्याची क्षमता नाही. त्यामुळे भराडी देवीने राज्यात लोककल्याणकारी राज्य निर्माण होण्यासाठी आशीर्वाद द्यावेत, असा टोला राणेंनी लगावला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

