Share

नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी घेतली खासदारकीची शपथ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार मा. श्रीनिवास पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील बहुमताने निवडून आले व तिसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनुभवी नेते श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा तब्बल ८७ हजार मतांनी पराभव केला आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1196318681136914433?s=20

श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आहेत. निवडून आल्यानंतर अधिवेशनाच्या सुरवातीलाच त्यांचा शपथविधी पार पडला. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. उदयन राजेंच्या राजीनाम्याने रिकामी झालेली सातारा लोकसभेची जागा भरण्यासाठी विधानसभेच्या सोबतच लोकसभेची देखील पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उदयन राजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी बहुमताने विजय मिळविला. यापूर्वी देखील 1999 साली श्रीनिवास पाटील यांनीच उदयनराजे यांना निवडणुकीत धूळ चारली होती.

दरम्यान, आजपासून लोकसभेचे हिवाळी अधिवशेन सुरु झाले आहे. महाराष्ट्र व हरियाणा मधील विधानसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच विकेंद्रीय अधिवेशन होत आहे. यावेळी महाराष्ट्रात सुरु असणारा सत्तासंघर्ष , शिवसेना – भाजप महायुतीतील फूट यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळालेली तगडी बाजू या सर्वांचा प्रभाव चर्चेवर दिसून येऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1196323503152062464?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1196325866873049088?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!