Share

उद्धव ठाकरे यांनी उद्या बोलावली आमदारांची निर्णायक बैठक

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला भाजपकडून राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर शिवसेना मात्र फिफ्टी – फिफ्टीच्या फार्म्युल्यावर अडून बसली आहे. दुसरीकडे शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मदत करण्याची चर्चा देखील सुरु आहे. आज सकाळपासून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

असे अतानाच उद्या मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दरम्यान उद्या सकाळी 11.30 वाजता उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली आहे . आमदारांची मतं जाणून सरकार स्थापनेविषय या बैठकीतून भूमिका ठरवणार आहे. या बैठकीत शिवसेना सत्ता स्थापनेवर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार याची भेट घेत चर्चा केली. पवारांच्या भेटीनंतर लागलीच यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली आहे. शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे हि सदीच्छा भेट असल्याचं म्हणत भाजप – शिवसेनेच्या बाजूने महाराष्ट्रातील जनतेन सत्तेचा कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी सत्तास्थापन करत राज्यातील जनतेला दिलासा द्यावा. कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला विरोधात बसण्यास जनतेन सांगितल आहे. त्यामुळे आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करु, असं म्हंटले आहे.

पवार यांच्या विधानानंतर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत ‘शरद पवार बोलले यामध्ये काहीही चुकीचं नाही, ज्यांच्याकडे १०५ चा आकडा आहे त्यांनी सरकार बनवावं, म्हणत भाजपला चुचकारले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192018622777970688?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192021160562552834?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192022714107621376?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192026653280485376?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!