टीम महाराष्ट्र देशा :-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही राज्याच्या दौऱ्यावर आहे. शिवस्वराज्य यात्रा ही माळशिरस येथे आली असता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सभेला सांभोधीत केले. यावेळी त्यांनी दिलीप सोपल यांच्यावर जोरदार टीका केली. ते बोलताना म्हणाले की, उभी हयात एका बाजूला घातली आणि तिन्ही सांजेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दारात पाणी भरायला गेलात, अशी टीका जयंत पाटील यांनी सोपल यांच्यावर टीका केली.
विधानसभेमध्ये सोपल यांनी कायम शिवसेनेवरच टीका केली आणि आज ते त्यांच्या दारीच बंधन बांधायला गेले आहेत. असे ही जयंत पाटील यावेळी म्हणाले. यासोबतच मुखमंत्री देवेंद्र फडणवीस याचा पक्षावर आत्मविश्वास असता तर महाजानदेश यात्रा त्यांना काढावी लागली नसती असा टोला पण त्यांना लावला.
दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिलीप सोपल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रवेश केला आहे. त्यापूर्वी मंगळवारी दिलिप सोपल यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

