टीम महाराष्ट्र देशा : जेव्हा पहिल्यांदा काश्मीरमधून हिंदू निर्वासित म्हणून आले तेव्हा सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आसरा दिला.आता सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे आता बाहेरच्या देशातून हिंदू येणार, त्यांची काळजी कोण घेणार? त्यांना कुठे ठेवणार ? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. केला. विधानसभेत त्यांनी आज सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन भाजपावर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बेळगावचा मुद्दाही उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव, कारवार, निपाणीमधल्या मराठीभाषिकांचा महाराष्ट्रात येण्यासाठी आक्रोश सुरु आहे. तेथील मराठी भाषिकांवर अत्याचार होत आहे. ते हिंदू नाहीत का ? असा सवाल उद्धव यांनी विचारला. महाराष्ट्रासाठी आपण एकत्र येऊ. सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र प्रयत्न करु, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
त्याचप्रमाणे त्यांनी बेळगाव सीमा प्रश्नावर कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात असा शब्द प्रयोग केला. सीमा प्रश्नावर केंद्र सरकारणे न्यायालयात महाराष्ट्राची बाजू न घेता कर्नाटकची बाजू घेतली असा आरोपही त्यांनी केला. बेळगाव कारवार पाकिस्तानात आहे का? ते मराठी हिंदू नाहीत का? देशातील हिंदुंना न्याय देता येत नसेल तर बाहेरचे हिंदु कशाला हवेत, असा सवाल त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1207565828608032770?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1207569748117970944?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

