मुंबई : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु होता. या सामन्यात पाहुण्या न्युझीलंडने यजमान इंग्लंड संघाचा 8 गडी राखुन पराभव केला आहे. या विजयासह न्युझीलंडने दोन कसोटी सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे आगामी डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी हा विजय न्युझीलंडच्या संघाचा आत्मविश्वास वाढविणारा ठरला आहे. येत्या 18 ते 22 जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान साउथहॅम्पटन येथे हा सामना खेळविण्यात येणार आहे.
या सामन्यापूर्वी दिग्गज भाकीत करताना दिसत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील सामन्यापूर्वी आपले मत मांडले आहे. सचिनच्या म्हणण्याप्रमाणे न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील हवामान हे बऱ्यापैकी समान असल्यामुळे आणि इंग्लंडच्या खेळपट्ट्याही न्यूझीलंडप्रमाणेच वेगवान गोलंदाजांना साथ देण्याऱ्या असल्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला अधिक संधी असल्याचे व न्यूझीलंडचं पारडं किंचित जड असल्याचं म्हटलं आहे.
प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, ‘न्यूझीलंडचं पारडं किंचित जड असण्याचं कारण ,म्हणजे त्यांनी इंग्लंडविरोधात दोन कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय संघाने मात्र सराव सामन्याव्यतिरिक्त इंग्लंडमध्ये या सामन्यापूर्वी सामना खेळलेला नाही. तेंडुलकर पुढे म्हणाला, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतरही खेळवता येऊ शकली असती. तसं झालं असतं तर दोन्ही संघ हे सर्वार्थाने समसमान होऊन एकमेकांसमोर उभे बरोबरीत असते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राम मंदिराच्या निधीत एका रुपयाचाही घोटाळा नाही, शिवसेनेने माफी मागावी’, राम कदमांची मागणी
- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; उदयनराजे, राणे की प्रीतम मुंडे? जाणून घ्या कोणाची लागणार वर्णी..
- शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

