🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पुणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणुक येत्या २२ नोव्हेबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबरला सकाळी ११ ते १ या वेळेत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. पिठासीन अधिकारी म्हणुन महाराष्ट्र जलसर्वक्षण विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक होणार आहे. अशी माहिती नगरसचिव सुनिल पारखी यांनी दिली.
खुला प्रवर्ग सर्वसाधारणसाठी मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर या महापालिकांसाठी सोडत काढण्यात आली. खुला प्रवर्ग महिलांसाठी नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर या महापालिकांसाठी सोडत काढण्यात आली आहेत.
पुण्यात महापौर पद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने भाजपच्या सर्वच नगरसेवकांना महापौर व्हायचे आहे. महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक आहेत. अडीच वर्षे महिलेला संधी दिल्याने यावेळी पुरुष नगरसेवकाला महापौर पद देण्यात येणार असल्याचे समजते.
पुण्यात महापौर पदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहेत. नगरसेविका मंजुषा नागपुरे, मंजुश्री खर्डेकर, ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, वर्षा तापकीर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, धीरज घाटे, राजाभाऊ लायगुडे, हेमंत रासणे, दिलीप वेडे पाटील, सुशील मेंगडे, दीपक पोटे, प्रसन्न जगताप यांच्याही नावाची महापौर पदासाठी चर्चेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195618584015196160?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195618248064036865?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
