मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानची आई गेल्या दीड महिन्यांपासून आजारी असून, काल अचानक त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्री झरीन खानने सोशल मीडियाद्वारे तिच्या आईसाठी प्रार्थना करण्याचं आवाहान केले आहे.
https://www.instagram.com/p/CPXi62MJ98C/?utm_source=ig_embed&ig_rid=4167fd0d-5ad1-484a-bec9-6bd0d5a5b361
झरीन खानने तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘मला माहित आहे मला थोडा उशिर झाला आहे. पण माझ्या वाढदिवसाच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. मला त्याच वेळी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करणं जमलं नाही. गेल्या दीड महिन्यांपासून माझी आई आजारी असल्यामुळे तिची फार काळजी वाटत होती. सध्या त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माझी आई लवकर बरी व्हावी, यासाठी तुम्ही सर्वांनी कृपया देवाकडे प्रार्थना करा.” असे म्हणत तिने चाहत्यांकडे आईची तब्येत ठीक होण्यासाठी भावुक होत आवाहान केले आहे.
अभिनेत्री झरीन खानने बॉलीवूड मध्ये अनेक चित्रपट केला आहेत. अनेक दिग्गज कलाकारांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली आहे. लवकरच तिच्या आगामी पंजाबी फिल्म ‘पटाके पाएंगे’ मधून झळकणार आहे. या फिल्मचं दिग्दर्शन समीप कांग यांनी केलं आहे. तिच्या काही वेब सीरिज देखील रिलीज होणार असल्याचे समजत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
- दिलासादायक! तब्बल ३ महिन्यांनी जालन्यात रुग्णसंख्या शंभरच्या आत
- ‘कोरोनामहामारीतही स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत, लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा ज़ोर’
- राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये – कॉंग्रेस


