Share

राज ठाकरेंची नाशिकमध्ये शेवटची सभा, शेवटच्या सभेत करणार सर्वात मोठी पोलखोल ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लाव रे व्हिडीओचा झंजावात आज नाशिकमध्ये पहायला मिळणार आहे, लोकसभा निवडणुकीत मनसेकडून एकही उमेदवार न देता राज ठाकरे यांनी मोदी – शहांच्या विरोधात रान उठवले आहे. राज्यातील शेवटच्या टप्यातील मतदान सोमवारी पार पडणार आहे. तर आज शेवटच्या सभेत राज ठाकरे मोठी पोलखोल करण्याचे संकेत मिळत आहेत.

नाशिकमधील सभा ही पोलखोलचा ग्रँड फिनाले असल्याचे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या सभेत राज ठाकरे भाजपवर कडाडून टीका करतानाच मोठी पोलखोल करण्याची शक्यता आहे.

पनवेलमध्ये राज यांची मोदींवर कडाडून टीका

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार लढत असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात गुरुवारी राज ठाकरेंची सभा पार पडली. पनवेलमधील सभेत त्यांनी भाजपच्या एका व्हिडीओची पोलखोल केली आहे. मोदींची प्रचारसभेटील गर्दी म्हणून व्हायरल होणारा व्हिडीओ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अंतयात्रेतील असल्याचं सत्य राज ठाकरे यांनी समोर आणले आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजप – शिवसेनेवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात १ लाख वीस हजार विहिरी बांधल्याचं सांगतात, तर मोदी आठवड्यात ८ लाख संडास बांधले म्हणतात. भाजपचे नेते दावेच असे करतात की तपासता येणार नाहीत, मात्र आपण ह्याचा शोध घेणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!