Share

प्रकरणात नवा ट्विस्ट! करुणा शर्मांच्या गाडीत बंदूक ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल

Published On: 

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध पुरावे देणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर करत, परळी शहरामध्ये आलेल्या करुणा शर्मा यांना काही महिलांनी रविवारी घेराव घातला. यातच, शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. तर, ‘पिस्तुल माझे नसून, मला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक हे पिस्तुल गाडीत टाकले आहे,’ असा आरोप शर्मा यांनी केला.

रविवारी परळीत दाखल होताच करुणा शर्मा यांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाटेतच त्यांची जीप अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. शर्मा व मुंडे समर्थक महिलांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. शर्मा यांना त्यांच्या गाडीत बसवून शहर ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या गाडीच्या तपासणीत पाठीमागच्या डिकीत बंदूक आढळले. ते पोलिसांनी जप्त केले आहे. शर्मा यांच्या गाडीच्या चालकाचीही चौकशी केली.

पोलिसांनी करुणा शर्मा यांच्या चारचाकी गाडीतून पिस्तूल जप्त केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळाने वैद्यनाथ मंदिराजवळून त्यांची गाडी मार्गस्थ होताना मागील डिकी उघडून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने काहीतरी वस्तू गाडीत ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. गाडीत आढळलेले पिस्तूल त्या व्यक्तीनेच ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

करुणा यांच्या कारच्या डिक्कीत वस्तू ठेवणारी व्यक्ती वेशभूषेवरुन महिला वाटत असली तरी एकूण हालचाली पहाता महिलेचा वेष घेऊन आलेला तो पुरुष आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वस्तू ठेवणारा तो की ती याचेही उत्तर आता पोलिसांना शोधावे लागेल. या प्रकरणातील गुंतागूंत वाढत असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!