🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सत्ता संघर्षाच्या काळात शिवसेना नेते संजय राऊत हे माध्यमांचे आणि राजकीय प्रकीयेचे केंद्रबिंदू ठरले आहेत. या सत्ता संघर्षात असलेली शिवसेनेची भूमिका संजय राऊत परखडपणे मांडत आहेत. तसेच ‘सामना’च्या अग्रलेखातूनही ते सूचक विधानं आणि इशारे देत आहेत. आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एक सूचक इशारा देणारी कविता ट्विट केली आहे.
तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं… कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं, अशा ओळी त्यांनी ट्विटरवर पोस्ट केल्या आहेत. राऊत यांनी आपल्या मनातली भावना व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा दुष्यंत कुमार यांच्या ओळींचा आधार घेतला आहे.
तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं
कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहींदुष्यंत कुमार
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 7, 2019
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सकाळीच ट्विट आणि पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून शिवसेनेचा अजेंडा मांडताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषद आणि ट्विटकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192300947470348289?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192300717630873600?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
