Share

मी पवारांशी बोलल्याने कोणाकोणाला पोटशूळ उठलयं, हे आम्हाला माहिती आहे – संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार यांच्याशी बोलण्यात गैर काय आहे. होय, मी त्यांच्या संपर्कात आहे. शरद पवार यांना राज्यात कशाला बोलविता. ते खूप मोठे नेते आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्याशी कोण-कोण बोलतय हे मला माहिती आहे. कोणकोणाला पोटशूळ उठला आहे, हे आम्हाला माहिती आहे. शरद पवार केंद्रातील मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल. आमची भूमिकाही वेट अँड वॉचची आहे. दिल्लीचे प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही. राज्यातला निर्णय राज्यातच होईल. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच व्हावा. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे अशी भूमिका शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांचीही आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः आम्हाला राज्यपालांकडे पाठविले. शिवसेनेची भूमिका स्पष्ट करावी असे त्यांनी सांगितले होते. अस संजय राऊत म्हणाले आहेत.

तर, संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून सतत भाजपवर टीका करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदावर सतत दावा करण्यात येत असल्याने अद्याप भाजप-शिवसेनेत चर्चा झालेली नाही. संजय राऊत यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191595179163058176?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191594647732121601?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191592329561268224?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!