टीम महाराष्ट्र देशा : ‘संजय राऊत यांची भूमिका हळूहळू बदलत आहे. शिवसेना सरकारमध्ये येणार आहे. त्यामुळे संजय राऊत तिखट असले तरी आम्ही चिकट आहोत,’ असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राऊत यांना लक्ष केले आहे.
ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, एकीकडे सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच असताना, महायुतीतील घटक पक्षांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे देण्यात यावीत, अशी मागणी आठवले यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाने जी विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे,’ असे आठवले म्हणाले. महायुतीला लोकांचा जनादेश मिळाला आहे, असे देखील आठवले यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, भाजपने शिवसेनेच्या वाघांची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असताना शिवसेनेने पूर्वीचा बाणा कायम ठेवला आहे. प्रत्यक्ष सत्तावाटपाच्या वेळीदेखील भाजपकडून २०१४ चाच पॅटर्न अवलंबिला जाण्याची शक्यता असून, शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद आणि अन्य तेरा खाती दिली जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1189857489564520448?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1189860546293616640?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

