टीम महाराष्ट्र देशा : देशातील कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी “ कांदा निर्यातीसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय म्हणजे पोरखेळ आहे. तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील दरांची तुलना केली तर कांदा निर्यात होणं शक्य नाही. आयात निर्यातीचं धोरण स्थिर असावं. अशात सरकारने हा निर्णय घेतला आहे. हे सरकार शेतकऱ्याला मातीत घालायला निघालं आहे,”अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.
त्याशिवाय ऑगस्ट मध्ये पूराचा फटका आणि खरिपातील कांदा बाजारात न आल्याने देशभरात कांद्याचे दर ४५ ते ५० रुपये किलो आहे. त्यात पूरपरिस्थिमुळे जूनमध्ये होणारी लागवड सप्टेंबरमध्ये करण्यात आली. त्यामुळे आता ऐन सणासुदीत कांद्याच्या किंमती वाढायला लागल्या होत्या. त्यात पाकिस्तानातून कांदा आयात करूनही कांद्याचे दर नियंत्रणात न आल्याने सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
“केंद्राने निर्यातमूल्य वाढवून पुन्हा कांदा निर्यात थांबवली आहे. पुढील महिन्यात खरिपाचा कांदा बाजारात आला की, शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होणार हे निश्चित आहे. आयात निर्यातीचं धोरण स्थिर असावं. ज्यामुळे शेतकऱ्यांना निर्यात करताना फायदा होईल, अशी मागणी आम्ही यापूर्वीही केली आहे. शेतकरी रस्त्यावर कांदा फेकत होते तेव्हा कांदा खरेदी करण्यात आला नाही आणि आता ही बंदी घालण्यात आली आहे. या शब्दात शेट्टी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
महत्त्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178284724592099335?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178284169681522688?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178278984359899138?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

