🕒 1 min read
उस्मानाबाद : यावर्षीची शिवजयंती उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ऐतीहासिक ठरली आहे. शिवजंयतीच्या शुभमुहुर्तावर उस्मानाबाद स्टेशनवर कोल्हापूर-धनबाद या नवीन रेल्वेची सुरुवात झाली. शुक्रवारी कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेस उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवर आली असता उस्मानाबादकंरानी रेल्वेचे भव्य स्वागत केले.
दीक्षाभूमी एक्सप्रेस ही महाराष्ट्र आणि उत्तर भारताला जोडणारी महत्वाची रेल्वे आहे. अनेक दिवसापासुन ही रेल्वे उस्मानाबाद मार्गे वळवावी अशी मागणी होत होती. या मागणीला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आखेर या रेल्वेला उस्मानाबादमार्गे धावण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे उस्मानाबादेतील भाविकांची व प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. आज स्टेशनवर ये रेल्वे गाडीचे पुष्पहार घालून स्वागत केले. उस्मानाबादकरांचे स्वागत स्विकारून ही रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
अनेक वर्षापासून ही रेल्वे सातारा, पुणे, अहमदनगर , औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेडमार्गे धावत होती. या मार्गानुसार कोल्हापुर ते नागपुर हे अंतर ४०८ कि.मी लाबून जावे लागत होते. यामुळे प्रवासाला १२-१५ तासांचा अधिक वेळ लागत होता. यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्ययही होत होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोलापूर मंडळाचे सल्लागार समिती सदस्य श्यामसुदंर मानधना यांनी ही रेल्वे लातूरमार्गे वळवावी अशी मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार?
- योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना औषधह बाजारात, लॉचिंगला केंद्रीय आरोग्यमंत्री आणि गडकरी
- रायगडावर विद्युत रोषणाईवर अजित पवार म्हणाले, हा उत्साही लोकांचा अजाणतेपणा !
- सरकार आपल्याच आमदारांना घाबरतंय ? फडणवीसांच्या टीकेवर अजितदादांचं रोखठोक उत्तर
- ‘काही साप चावतात, काही चावत नाहीत ; पण त्यांना ठेचायचं असतं’


