टीम महाराष्ट्र देशा : ‘मला म्हातारा म्हणू नका, मी अजूनही तरुण आहे’, हे वाक्य फक्त भाषणापुरतं न ठेवता ज्यांनी प्रत्यक्षात मैदानात उतरून विरोधकांचा किल्ला एकहाती लढवला, ते ७९ वर्षांचे तरुण आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत १ ऑक्टोबर पासून ते १९ ऑक्टोबर पर्यंत पवार यांनी तब्बल ५८ सभा घेतल्या. विदर्भापासून ते कोकणापर्यंत पवार यांनी १९ दिवसांत पुर्ण महाराष्ट्रात भ्रमंती केली. पवारांच्या या लढतीने राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिली. एवढच नाही तर पवारांनी आपल्या चाणाक्ष राजकीय खेळीने राष्ट्रवादीला थेट सत्तेच्या तख्तापर्यंत पोहचवले.
शरद पवारांच्या या झंझावातात त्यांना सर्वात जास्त साथ मिळाली ती राज्यातील तरुणांची आणि शेतकऱ्यांची. आणि याबद्दल शरद पवारांनी वेळोवेळी बोलून देखील दाखवलं आहे. याचाच प्रत्येय पुन्हा एकदा आलाय. शरद पवारांच्या प्रेमापोटी शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या एका तरुण शेतकऱ्यांनी २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करत पवारांना त्यांच्या मुंबईतील घरी भाजीपाला पोहोचवला आहे.
सुनील सुक्रे ह्या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या शेतकऱ्याने २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून मला मुंबईत भाजीपाला आणून दिला. अशा काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे. pic.twitter.com/9T7o3BuzSu
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 22, 2019
सुनील सुक्रे या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या शेतकऱ्याने २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून मला मुंबईत शरद पवार यांना भाजीपाला आणून दिला. त्यांनतर अशा काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे. अस म्हणत या तरुण शेतकऱ्याचे पवारांनी मनोबल वाढवले आहे.
दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी शरद पवारांनी सातारा येथे लोकसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्त श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेवेळी सभास्थळी पाऊस पडतच होता. मात्र कार्यकर्ते जागेवरुन उठत नव्हते. कार्यकर्त्यांचा हा जोश पाऊन पवारांनी भाषण केले. पवारांच्या भाषणावेळी पावसाचा जोर वाढला आणि पवारांनी तेवढ्याच तडफेने सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. पवारांची ही सभा निवडणुकीच्या राजकारणात पुढचे अनेक वर्ष चर्चेचा विषय ठरणारी झाली. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी पवारांच्या या सभेची नोंद महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमची झाली आहे. त्यामुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम पवार नेहमी करतात हे आज पुन्हा सिद्ध झाल.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1197808213959118848?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1197807869594202113?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

