🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच विलेपार्ले पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच विद्या चव्हाण यांनी आपल्यासह कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तक्रारदार सूनेला पहिली मुलगी आहे. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मात्र मुदतीआधीच प्रसुती झाल्याने बाळ दगावलं. त्यानंतर माझ्या छळात वाढ झाली, अशी तक्रार सूनेने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, विद्या चव्हाणांच्या सूनेने 16 जानेवारीला विलेपार्ले पोलिस ठाण्यात छळाबाबत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कलम 498 अ, 354, 323, 504, 506 आणि 36 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
https://www.youtube.com/watch?v=x1OMSDr8zqk
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

