🕒 1 min read
चेन्नई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. ९ एप्रिलला पहिला सामना तर अंतिम सामना हा ३० मे रोजी होणार आहे. मात्र, यंदाही स्पर्धा विनाप्रेक्षकच पार पडणार आहे. परंतु अखेरच्या टप्प्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्यास निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली. त्यातच आता आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी चेन्नईमध्ये पोहचला आहे. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स त्यांचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर खेळणार आहेत. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये त्यांना तळाच्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं आणि यंदा ती कामगिरी सुधारून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी ते सज्ज होत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सच्या वरिष्ठ खेळाडूंसह दोन युवा गोलंदाजही सरावाला लागले आहेत. महिश थिक्शाना आणि मथिशा पथिराणा या श्रीलंकन गोलंदाजांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. दोन्ही अनकॅप खेळाडू CSKच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत आणि पथिराणा यानं सर्वांचे लक्ष वेधलं आहे. त्याची गोलंदाजीची शैली ही लसिथ मलिंगाच्या शैलीशी तंतोतंत मिळतीजुळती आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निर्बंध लावा मात्र लॉक डाऊन नको’ पुणे व्यापारी महासंघाच अजित पवारांना पत्र
- शहरातील ‘या’ प्रसिद्ध दुकानांना, हॉटेलचालकांना उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा दणका
- आज मिताली आणि विराट ब्रिगेड दिसणार मैदानावर
- यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील संपन्न, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी दृढसंकल्प करूया – अजित पवार
- विनामास्क फिरणाऱ्या युवकाकडून मनपा कर्मचाऱ्याला मारहाण


