Share

शहरातील ‘या’ प्रसिद्ध दुकानांना, हॉटेलचालकांना उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा दणका

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनपा व जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र नागरिकांकडून अजूनही कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने गुरुवारी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी हे स्वत: रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नागरिकांवर कारवाई करत मोठ्या आणि प्रसिद्ध व्यावसायिकांना, दुकानदारांना, हॉटेलचालकांना दंड करत दुकाने बंद करण्याचे आदेश दिले.

मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखील गुप्ता व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोना जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यावेळी त्यांनी थेट क्रांती चौक, रेल्वे स्टेशन, बाबा पेट्रोल पंप, गुलमंडी, पैठणगेट, रोशन गेट भागात दुकान, हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली.

यावेळी क्रांतीचौकातील प्रसिद्ध मनुभाई मिठाई दुकानातील कर्मचाऱ्यांनी व चालकाने कोरोना चाचणी केली नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तातडीने कोरोना टेस्ट करण्यास सांगुन चाचणी केल्याशिवाय दुकान न उघडण्याचे आदेश दिले. डिग जाम या दुकानातील ऑक्सीमीटर व थर्मलगन बंद असल्याने दुकानदाराकडून २००० रुपये दंड वसूल केला. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या व्हिनस दुकानदाराला ४०००, क्लासमेंट दुकानाला २०००, खन्ना एजन्सीला २०००, स्वाद हॉटेलला २०००, मास्टर बिग २०००, विट्स हॉटेलला  ५000, तिरुपती हॉटेलला १९,०००, हॉटेल न्यू पंजाबला ५००० रुपये दंड आकारण्यात आला. यापुढे नियमांचे पालन न केल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!