Share

‘या’ तीन जिल्ह्यातील मजूर श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना

Published On: 

नांदेड : लॉकडाऊनमुळे देशभर नागरिक, मजूर अडकले आहेत. नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिहारी नागरिक अडकलेले आहेत. नांदेडमध्ये एक हजार नागरिक असल्याचे लक्षात आल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेऊन नांदेडसह इतर जिल्ह्यातील अडकलेल्या बिहारी नागरिकांसाठी विशेष “श्रमिक एक्सप्रेस” आज सकाळी 11 वा. हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून सोडण्यात आली.

ही विशेष श्रमिक एक्सप्रेस आरारिया, दानापूर (पटणा) आणि खागारिया या तीन स्थानकावर थांबणार आहे. नांदेड प्रशासनाने प्रत्येकाची आरोग्य तपासणीसह पाणी आणि डबाबंद जेवण सोबत दिले असून यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाचा सहभाग घेऊन अत्यावश्यक वस्तू सोबत दिल्या आहेत. या तीन जिल्ह्यतील जाणाऱ्या नागरिकांचा रेल्वे, आरोग्य आणि इतर बाबींचा समन्वय उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ आदी उपस्थित होते.

अभिनेता मनोज वाजपेयीच्या समोर नवाजने पत्नीसोबत केले होते असे काही की…

मालेगाव : आपत्कालीन परिस्थितीचे भान ठेवून थेट कार्यवाही सुरू करा

कोरोनाच्या संकटात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!