मुंबई : बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिनं आता तलाक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिनं नवाजला व्हॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवली आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक घटस्फोट याआधीही समोर आले आहेत ज्यामुळं सर्वजण चकित झाले आहेत.
या नोटीसीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आलिया सिद्दिकी अर्थात नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप लावले आहेत. आता मी घाबरणार नसून, स्पष्टपणे सगळ्या गोष्टी जाहीर करणार असल्याचे तिने म्हंटले आहे.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनच्या पत्नीने दीर आणि सासरच्यांकडून मारहाण होत असल्याचा आरोप केला आहे. तर गेल्या ४ ते ५ वर्षांपासून नवाजुद्दीन आणि ती वेगेळे राहत असल्याचा गौफ्यस्फोटही तिने केला.
कोरोनाच्या संकटात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल ?
पुढे बोलताना ती म्हणाली, ती मुलांसह वेगळी राहत असून, तो शेवटचा मुलांना भेटायला कधी आला होता हे देखील आठवत नसल्याचे म्हणत तिने आपले दुःख व्यक्त केले. खूप सहन केले आता बस झाले म्हणत तिने घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी आपल्याला देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आलिया सिद्दीकी म्हणाली, ‘आमच्या घरात मनोज बाजपेयी यांच्यासारख्या काही सेलिब्रिटीज होत्या, त्यावेळीही मला नवाजने तिचा सर्वांसमोर अपमान केला. नवाज नेहमी मला म्हणत राहिले की तुला काहीच माहित नाही. तुला कसे बोलायचे ते माहित नाही, म्हणूनच मी तुला इतरांसमोर नेत नाही.
लॉकडाऊन शिथिल करताना विविध क्षेत्रांना गती देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

