Share

कोरोनाच्या संकटात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल ?

Published On: 

पुणे : Immunity म्हणजेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती. बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात विशेषतः ऋतू बदला नंतर आणि इन्फेक्शनच्या विळख्यात येणे हे याचे प्रमुख कारण असते. या आजारपणास कारण बॉडी इम्युनिटी चांगली नसणे हे असते. जर Immune system मजबूत नसेल तर शरीराची रोगांच्या सोबत लढण्याची शक्ती कमी होते ज्यामुळे आपण लवकर आजारी पडतो. आज आपण रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढविता येईल याची माहिती करून घेणार आहोत.

राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनासह इतर संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. यासाठी लसून हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो असं समोर आलं आहे. लसून मध्ये जीवाणुरोधी, एंटिफंगल आणि एंटीवायरल गुण आहेत. जे संक्रमण आणि बैक्तीरीया पासून वाचण्यास मदत करतात.

ग्रीन टी किंवा ब्लॅक टी या दोन्ही गोष्टींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार फायदेशीर आहे. पण दिवसभरात एकदा किंवा दोनदा ग्रीन किंवा ब्लॅक टी प्या. जर तुम्ही अतिप्रमाणात याचे सेवन केलात तर ते शरीरासाठी हानिकारक असते. हर्बल टी किंवा औषधी काढ्याचं सेवन करा. यासाठी तुळस, दालचिनी, काळी मिरी, आले आणि मनुका एकत्रितरित्या पाण्यामध्ये उकळा. हे मिश्रण नीट उकळल्यानंतर एका ग्लासमध्ये गाळून घ्या. दिवसभरात या काढ्याचं तुम्ही एक किंवा दोन वेळा सेवन करू शकता. काढ्याची चव अतिशय तिखट वाटल्यास यामध्ये तुम्ही गुळ किंवा लिंबूच्या रसाचा समावेश करू शकता.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ‘एसएलबीसी’ची बैठक तातडीने बोलवा : देवेंद्र फडणवीस

याशिवाय तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकता.हळदी मध्ये कर्क्यूमिन यौगिक आणि एंटीऑक्सिडेंट कोशिकाना संक्रमणा पासून वाचण्यासाठी जास्त शक्तीशाली करण्याची ताकत असते आणि इम्यून सिस्टम साठी ते महत्वाचे आहे. 150 मिलिलीटर दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून तयार झालेले हळदीचं दूध दिवसातून एक किंवा दोन वेळा प्या. हळदी दूध पिण्यापूर्वी किंवा प्यायल्यानंतर लगेचच कोणताही पदार्थ खाण्याची चूक करू नका.

लिंबूवर्गीय (सी जीवनसत्व) फळांमध्ये रोगप्रतिकारक पेशी सक्षम करण्याची क्षमता जास्त असते. तसेच सुका मेवा, कडध्यान्य (ई जीवनसत्व) गाजर आणि रताळी (ए जीवनसत्व), यासह पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, खेकडे आणि शिंपले (बी जीवनसत्व) याच्या सेवनानेही रोगप्रतिकार शक्ती वाढते. कच्चा लसूण (ए आणि ई जीवनसत्व) रोगप्रतिकार शक्ती बुस्ट करतो आणि रोज जेवताना दही खाल्याने पाचनतंत्र ठीक राहते. सिजननुसार फलाहार घ्यावा.

आता फक्त बोलून नाही तर करुन दाखवा : आशिष शेलार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!