भोपाळ : जगभरात कोरोना थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या कोरोनाच्या संकटात अनेक अडचणींवर मात करत अखेर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘कॅबिनेट’चा विस्तार केला आहे. या विस्तारानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्यावर टीकास्त्र डागले. “टायगर अभी जिंदा है,” असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे कमलनाथ व दिग्विजय सिंह याना उत्तर दिलं.
मध्य प्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “मला कमलनाथ वा दिग्विजय सिंग यांच्याकडून कोणतंही प्रमाणपत्र नकोय. त्यांनी १५ महिन्यांच्या काळात राज्याला लूटलं आहे. त्यांनी सगळ काही स्वतःसाठी केलं. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, टायगर अभी जिंदा है,”
मध्य प्रदेश के विकास, प्रगति, उन्नति और मेरे प्रदेशवासियों की रक्षा के लिए टाइगर अभी ज़िंदा है। pic.twitter.com/PEIi2vH7mj
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) July 2, 2020
पुढे मंत्रिमंडळ विस्ताराविषयी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “ज्या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते जनतेसाठी काम करतील. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली १०० दिवसांपूर्वी सत्तेत आलेलं सरकार कोरोना विरुद्ध लढाई लढत आहे. शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे. पुढील चार वर्षातही असंच काम करत राहू. ज्या बारा व्यक्तींनी शपथ घेतली आहे. ते सर्व पोटनिवडणुकीत विजयी होतील,” असा विश्वासही ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्चमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चाही सुरू झाली. मात्र, गुरूवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे शिवराज सिंह चौहान यांना भारी ठरले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या वर्तुळातील १२ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
कौतुकास्पद : राज्यात आतापर्यंत तब्बल १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार
सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पायदळी तुडवत भाजप खासदाराने मुलाचे लग्न थाटात दिले लावून
‘आम्ही ८० वर्षाच्या लढव्या सोबत’, बारामतीकरांनी अजित पवारांच्या निर्णयाचा केला निषेध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

