🕒 1 min read
लखनौ : एका बाजूला देशात कोरोनाने थैमान घातले आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक नेत्यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. जालौन जिल्ह्यात रविवारी भाजपाचे खासदार भानू प्रताप वर्मा यांनी मुलाचे मोठ्या थाटात लग्न लावले आहे. या विवाहसोहळ्यामध्ये सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पायदळी तुडविण्यात आले. त्यामुळे नियम फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.
‘चंद्रकांत पाटील तुमच्यात खरंच दम असेल तर समोर येवून बोला’…
जालौन-भोगनीपूर-गरौठा येथून लोकसभेवर गेलेले भानु प्रताप वर्मा यांचे कोंचमध्ये घर आहे. रविवारी रात्री त्यांनी मुलगा महेंद्र याचे लग्न लावून दिले. यावेळी लग्नामध्ये लोक मास्क न वापरता वावरत होते. सोशल डिस्टंन्सिंगचीही काळजी घेतली गेली नाही.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लग्नामध्ये 50 हून अधिक लोक सहभागी होऊ शकत नाहीत. मात्र, या लग्नसोहळ्याला त्याहून खूप जास्त लोक सहभागी झाले होते.विशेष म्हणजे कोरोनामुळे कोंचच्या एसडीएम अशोक कुमार यांनी 12 जूनला पत्रक काढून लग्न सोहळ्याला केवळ 5 लोकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते.
आनंदाची बातमी : आजपासून मिळणार रेल्वेची तत्काळ तिकीट बुकिंग सेवा
आता भानू प्रताप वर्मा यांच्या या लग्नसोहळ्याने राज्यातील राजकारण तापू लागले आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले असून सोशल मिडीयावर या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या मुद्द्यावरून भाजपला मोठ्याप्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
