Share

‘आम्ही ८० वर्षाच्या लढव्या सोबत’, बारामतीकरांनी अजित पवारांच्या निर्णयाचा केला निषेध

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले आहे. अनपेक्षितरित्या भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवारांचा पाठींबा घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. एवढ्यावरचं थांबले नसून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर पवार कुटुंबात मोठी उलथापालथ झाली असल्याची दिसत आहे. तर बारामती येथेही अजित पवारांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे.

बारामतीत सध्या दोन गट पडले आहेत. एका बाजूला अजित पवार समर्थक गट आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार समर्थकांचा गट आहे. तर बारामतीत पोस्टरबाजीलाही सुरवात झाली आहे. आम्ही ८० वर्षाच्या लढव्या सोबत आहे. अश्या आशयाचे पोस्टर बारामतीत लावण्यात आले आहेत. काही नागरिकांनी अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला आहे.

दरम्यान कालपर्यंत राज्यात महाविकासआघाडीची चर्चा होती. कालच्या संयुक्त बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा झाली. मात्र आज सकाळी राजकीय भूकंप होतं अजित पवार आणि भाजपने एकत्र येत महाविकासआघाडीचा डाव उलथवून लावला आहे. राज्यातील राजकारणाचा झांगडगुत्ता झाला आहे. अजित पवारांनी भाजपला पाठींबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आमचा अजित पवारांना पाठींबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यात शिवसेनेनेही भाजपला लक्ष्य करत शिवरायांच्या महाराष्ट्रावर भाजपकडून फर्जिकल स्ट्राईक केला आहे, असा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1198148033050841088?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1198144724713926657?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1198139858348335104?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!