Share

‘बोऱ्हाडे-शेरकर’ प्रकरणात कोल्हेंसारख्या व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरून निघणार नाही’

Published On: 

जुन्नर : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पेटलेला आणि महाराष्ट्रभर गाजलेला अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध सत्यशील शेरकर हा वाद अखेर मिटला आहे. दोन्ही बाजूंकडून सामोपचारानं हा वाद मिटवण्यात आला आणि चक्क या दोघांची गळाभेट देखील पहायला मिळाली.

शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील शिवऋण प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यातील वादावर रविवार (ता. ३१ रोजी) पडदा पडला आहे. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून हा वाद मिटविण्यात बेनके तसेच शिरोली ग्रामस्थांना यश आले आहे.

बोऱ्हाडे यांनी फेस बुक लाईव्हच्या माध्यमातून समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडीओ मुळे संपुर्ण राज्यात या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवजन्मभूमी विषयी होत असलेल्या चर्चेस पूर्ण विराम मिळावा व घरातले भांडण घरातच मिटले जावे या हेतूने ंआमदार बेनके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली.

याप्रकरणी नाण्याची दुसरी बाजू तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे. तरी, याप्रकरणात कोणावर अन्याय झाला असेल तर कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना संबंधित पोलीस खात्याला मी आधीच केली आहे, असे कोल्हे यांनी म्हटले होते. कोल्हेंच्या या सावध प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियातून कोल्हे यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं.

या प्रकरणात आता आ. अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. फेसबुक पोस्ट करून त्यांनी खा. अमोल कोल्हे यांना ट्रोल करणाऱ्या लोकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या पोस्ट मध्ये ते म्हणतात, अखेर टोळधाड उघडी पडली. राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार, आमचे बंधू अतुलशेठ बेनके यांनी भक्तांची धारण चांगलीच पाचावर बसवली. विरोधकांनी एक कायम लक्षात ठेवावं इथे नमो भक्त नाहीत इथे राष्ट्रवादी आहे. तुम्ही कसेही चाल खेळलात तरी डाव जिंकणारे योद्धे इकडेच आहेत. शेवटी अख्या टोळधाडी वर अतुलशेठ यांनी फवारणी करून ट्रोल करणारे उघडे नागडे केलेत, असं ते म्हणाले.

एक खंत कायम मनात राहील ती म्हणजे या सर्व प्रकारात खासदार डॉ. अमोल कोल्हे सारख्या प्रामाणिक व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दात त्यांनी दुःख देखील व्यक्त केलं.

सुप्रसिद्ध संगीतकार वाजिद खान काळाच्या पडद्याआड…

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ, गॅस सिलेंडर महागले

…तर ही वेळ आली नसती; अमित शाहांची कबुली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!