नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असताना आता नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे भारतातही किंमती वाढवण्यात आल्या आहेत. एक जूनपासून विनाअनुदानित गॅसच्या दरात वाढ आमंलात करण्यात आली आहे. १४ किलोच्या विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये ११ रुपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर कोलकात्यामध्ये ३१ रूपये ५० पैसे आणि चेन्नईमध्ये ३७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
Prices of non-subsidised 14 kg Indane gas in metros, applicable from today: In Delhi price rises to Rs 593.00 (increase by Rs 11.50/cylinder), in Kolkata – Rs 616.00 (increase by Rs 31.50), in Mumbai – Rs 590.50 (increase by Rs 11.50), in Chennai – Rs 606.50 (increase by Rs 37). pic.twitter.com/wn4hO4h8Rv
— ANI (@ANI) June 1, 2020
इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीमध्ये १४ किलोंचा विनाअनुदानित गॅसची किंमत ५९३ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ६१६ रुपये तर चेन्नईमध्ये ६०६.५० रुपये झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत १४ किलोच्या विनाअनुदानिक गॅसची किंमत ५७९ वरुन आता ५९०.५० रुपये झाली आहे.
मागील तीन महिन्यापासून सातत्याने गॅसच्या किंमतीत घट होत होती. मात्र,आता ही दरवाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या कात्रीत सापडलेल्या नागरिकांना हा मोठा धक्का असणार आहे.
…तर ही वेळ आली नसती; अमित शाहांची कबुली
लॉकडाऊनच्या काळात भारतीयांनी घालवला पोर्न साईटवर वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

