Share

सुप्रसिद्ध संगीतकार वाजिद खान काळाच्या पडद्याआड…

Published On: 

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईच्या चेंबूरमधील सुरराणा सेठीया रुग्णालयातवाजिद यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४३ वर्षाचे होते. किडनी आणि घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे मागील अडीच-तीन महिन्यांपासून रुग्णालयातच होते. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून वाजिद व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती.

किडनी आणि घशाच्या इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या वाजिद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचंही चर्चा होती. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. वाजिद खान यांना मागील वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.

वाजिद खान यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती किंवा रुग्णालयाने त्यांच्या मृत्यू संदर्भात कोणतंही अधिकृत पत्रक जारी केलेलं नाही. त्यामुळे वाजिद खान यांच्या मृत्यूसंदर्भात कोविड-19, किडनीच्या इन्फेक्शनपासून हृदयविकाराचा झटका अशी वेगवेगळ्या कारणांची अटकळ बांधली जात आहे.

वाजिद खान यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देत संगीतकार सलीम मर्चंट यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, "होय, हे खरं आहे की वाजिद आता आपल्यात राहिले नाहीत." परंतु सलीम यांनी कोविड-19 मुळे वाजिद यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त फेटाळत सलीम मर्चंट यांनी म्हटलं की, "जवळपास सहा महिन्यांपूर्वी वाजिद यांना किडनीचा त्रास झाला होता आणि मग त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर त्यांची रोगप्रतिकार शक्ती फारच कमी झाली होती. वाजिद यांच्या घशातही इन्फेक्शन झालं होतं, ज्यामुळे त्यांना घशात फार त्रास होत होताा. वाजिद यांच्या निकटवर्तींयांकडून समजलं की त्यांच्या मृत्यूचं कारण हे किडनीशी संबंधित अडचणी होत्या."

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!