Share

चिंताजनक ! देशात कोरोनाने घातले थैमान, गेल्या 24 तासात सापडले 3900 नवीन रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोनाबाधितांची संख्या आता 46 हजार 433 झाली आहे. तर गेल्या 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 3900 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे तर 195 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु होऊन देखील कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतचं आहे. विशेष म्हणजे आता मृतांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासांत आतापर्यंत सर्वात जास्त मृतांची नोंद झाली आहे. याआधी 24 तासांत 83 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र आता तब्बल 195 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह देशातील मृतांचा आकडा 1568 झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताचा मृत्यूदर कमी झाला होता. तर, आतापर्यंत 12 हजार 727 रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहे. भारतातील निरोगी रुग्णांची टक्केवारी ही 27.40 आहे. याआधी हा आकडा जास्त होता.

तसेच राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात सोमवारी नव्याने ७७१ रुग्णांची भर पडली आहे. राज्यात सोमवारी ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!