Share

वर्ल्ड कप २०१९ : बांग्लादेशला हरवत टीम इंडियाचा सेमिफायनलमध्ये प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशला हरवत टीम इंडियाने सेमिफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. टीम इंडियाने बांग्लादेशचा २८ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे बांग्लादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे .

विजयासाठी ३१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला सर्वबाद २८६ धावा करता आल्या. बांग्लादेशकडूनशकीब अल हसन ६६ , शब्बीर रहमान ३६ आणि शेवटी मोहम्मद सैफुद्दीनने नाबाद ५१ धावांची खेळी केली तर भारताकडून जसप्रीत बुमराहने ४ तर हार्दिक पंड्याने ३ गडी बाद केले. तसेच शमी, भुवनेश्वर आणि चहलने एक-एक फलंदाजाला माघारी पाठवले.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहोत शर्माच्या १०४ आणि लोकेश राहुल ७७ आणि ऋषभ पंतच्या ४८ धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात ९ बाद ३१४ धावा केल्या. बांग्लादेशकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या

दरम्यान, टीम इंडियाचे ८ सामन्यांमधून १३ गुण आहेत. शिवाय अजून एक सामना बाकी आहे. टीम इंडियाला पुढील सामना जिंकून पहिल्या स्थानावर येण्याचीही संधी आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!