Share

निरमाच्या जाहिरातीमधून अक्षय कुमारवर मराठा शासकांचा अवमान केल्याचा आरोप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत आहेत. विविध विषयांवरील चित्रपट, चित्रपटांची कमाई, अक्षयचा अभिनय, त्याचा दिनक्रम, फिटनेस आदी गोष्टींवरून तो नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी तो निरमा पावडरच्या जाहिरातीमुळं चर्चेत आला आहे. नुसता चर्चेतच नव्हे, तर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

निरमा वॉशिंग पावडरची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत अक्षय कुमारने एका मराठा राजाची भूमिका केली आहे. या जाहिरातीमुळे शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्याचं म्हणत अक्षय कुमारविरोधात मुंबईच्या वरळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही कळतंय.

निरमाच्या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात येत असून याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी आता शिवप्रेमी करत आहेत.

काय आहे जाहिरात ?

या जाहिरातीमध्ये मावळे लढाईवरून परतलेले दाखवण्यात आले आहेत. यानंतर एक महिला मावळ्यांच्या मळलेल्या कपड्यांवर नाराजी नोंदवत हे कपडे आम्हालाच धुवायला लागणार असं म्हणताना दाखवली आहे. यावर अक्षय कुमार उत्तर देत म्हणातो की, ‘महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं, और अपने कपडे भी. यानंतर सर्व मावळे आपले मळलेले कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!