Share

बच्चू कडू अविरत समाजसेवक ‘ ही ‘ बातमी वाचून तुम्हाला बच्चू कडूंविषयी आदर नक्कीच वाढेल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : प्रहार संघटनेचे प्रणेते बच्चू कडू अचलपूर मतदार संघाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या विभागांचे राज्यमंत्री. बच्चू कडू यांनी स्वत: आजवर जवळपास १०० वेळा रक्तदान केले आहे. त्याचबरोबर ते मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरही नेहमीच आयोजित करत असतात. त्यांना रक्तदान कार्यक्रमात मोठी आवड आहे.

विधानसभा निवडणुकीचा अर्जसुद्धा भाऊंनी रक्तदान करुन दाखल केला होता. तर, मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देखील त्यांनी रक्तदान केले होते. तसेच, मंत्रालयाचा पदभार स्विकारण्यापूर्वीही रक्तदान केलं होतं. त्यामुळे चांदुर बाजारमधील ज्ञानोदय महाविद्यालयात बच्चू कडू यांचा त्यांच्या पत्नीसह सपत्नीक सत्कार आणि रक्त तुला करण्यात आली.

आज बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी नयना कडू यांची रक्त तुला करण्यात आली.तब्बल १५६ बॉटल रक्त देऊन बच्चू कडू यांची सपत्नीक रक्त तुला करण्यात आली. अमरावतीच्या अचलपूर मतदार संघातील चांदूर बाजारात रक्त तुला करण्यात आली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!