🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: पोलिस ठाण्यात तक्रारदाराला कशी वागणूक मिळते. हे पाहण्यासाठी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी डमी तक्रारदारांमार्फत एकाच वेळी जिल्ह्यातील सिल्लोड शहर, गंगापूर, पैठण, वीरगाव आणि खुलताबाद पोलिस ठाण्यांचे स्टिंग ऑपरेशन केले. त्यापैकी वीरगाव आणि खुलताबाद पोलिस ठाण्यात कर्तव्यात कसूर करणाऱ्या ठाणे अंमलदारांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावत समक्ष हजर होऊन खुलासा करण्याचे आदेश पाटील यांनी दिले.
सिल्लोड शहर, गंगापूर, पैठण आणि वीरगाव पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीला गेला आहे. अशा प्रकारची तक्रार घेऊन डमी तक्रारदाराला पाठवण्यात आले होते. यापैकी सिल्लोड आणि गंगापूर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. पैठण पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आएमईआय क्रमांक घेऊन तत्काळ सायबर पोलिस ठाण्याला कळवला; मात्र वीरगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने फक्त तक्रार अर्ज ठेवून घेत कोणतीही कारवाई त्यावर केली नाही.
खुलताबाद पोलिस ठाण्यात महिला तक्रारदाराला पाठवण्यात आले होते. या महिलेने खुलताबाद बसस्टॅंडवर आपली छेडछाड झाल्याची माहिती देत तक्रार दाखल करण्याची विनंती केली. यावेळी संबंधित ठाणे अंमलदाराने तक्रार न घेता या महिलेला स्वहस्ताक्षरात तक्रार अर्ज देण्यास सांगितले. हा अर्ज ठाणे अंमलदाराने ठेवून घेतला. आम्ही चौकशी करू तुम्हाला काही होणार नाही असे सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीची मागणी केली असता छोट्या-छोट्या तक्रारी कशाला साहेबांना सांगता, आम्ही पाहून घेऊ, तुम्ही घरी जा असे सांगत पोलिस ठाण्याच्या वाहनामध्ये बसवून बसस्टॉपवर सोडून बसमध्ये बसवून दिले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205754789876748288?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205752346254311424?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205748230085955585?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
