नवी दिल्ली : देशभरात आज राष्ट्रीय किसान दिवस साजरा होत आहे. अशातच केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला विरोध करण्याकरिता गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. दरम्यान,नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असून, यामुळं कृषी क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा होतील, याचा पुनरुच्चार कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज केला.
आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. किमान हमी भाव देण्याची पद्धत कायम ठेवण्यात येणार असून, सरकारनं जाहीर केलेले कृषी मालाचे किमान हमी भाव हे उत्पादन शुल्काच्या दीड पट आहेत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असंही तोमर यांनी सांगितलं.
गेल्या सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक सुधारणा केल्या असून, विविध उपाययोजना राबवल्या आहेत. सर्व मुद्द्यांवर सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे, असंही तोमर यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.शरद पवार म्हणाले कि, अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तरीही संज्या राऊत निर्लज्जासारखा म्हणतो सेनाभवन राजकीय भूकंपाचं केंद्र होणार- निलेश राणे
- ‘या’आयटी कंपनी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार पगार वाढ !
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा, पक्ष सर्व मदत करेल : अस्लम शेख
- काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करणार : बाळासाहेब थोरात


