मुंबई- काल शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. यावर देखील त्यांनी प्रत्युत्तर देताना लवकरच शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील असं भाकीत वर्तवलं आहे.
महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत आहे. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेल. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेनाभवन असेल, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला होता.
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचं नुकसान केलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, कायदा-सुव्यवस्था, महिलांवरचे अत्याचार ह्या सगळ्या विषयात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे तरीही संज्या राऊत निर्लज्जासारखा म्हणतो सेनाभवन राजकीय भूकंपाचं केंद्र होणार, असं ट्विट निलेश राणे यांनी करून संजय राऊत यांना लक्ष केले आहे.
ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचं नुकसान केलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, कायदा-सुव्यवस्था, महिलांवरचे अत्याचार ह्या सगळ्या विषयात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे तरीही संज्या राऊत निर्लज्जासारखा म्हणतो सेनाभवन राजकीय भूकंपाचं केंद्र होणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 23, 2020
महत्वाच्या बातम्या
- २३ लाखांची बॅग परत करणाऱ्या प्रामाणिक सुरक्षा रक्षकाचा उपमहापौरांनी केला सत्कार
- ‘या’आयटी कंपनी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार पगार वाढ !
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा, पक्ष सर्व मदत करेल : अस्लम शेख
- काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करणार : बाळासाहेब थोरात


