बंगळूरू: देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. या काळात त्याचबरोबर त्यांनतर अनेक कर्मचार्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. त्यामुळे त्यांना नोकरी टिकवणे महात्वाचे आहे. त्यामुळे वेतनवाढ मिळणे सध्या तरी दुरापास्त आहे. मात्र या काळामध्ये देखील एका दिग्गज आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नववर्षापासून वेतनवाढ मिळणार आहे.
परंतु आता हळूहळू अनलॉक अंतर्गत देशातील सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. करोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी, वेतन कपात तसंच पगारवाढ नाकारली होती. तर आयटी क्षेत्रामध्ये जास्त पगारासाठी कर्मचारी वारंवार नोकऱ्या बदलताना दिसतात. अशात आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत थांबवून घेण्यासाठी आयटी कंपनी मोठं गिफ्ट दिलं आहे.
विप्रोने 1 जानेवारी 2021 पासून आपल्या जुनिअर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 1 डिसेंबर 2020 पर्यंत उत्तम काम करणाऱ्या B3 बँडच्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आहे. यामध्ये विप्रो त्यांच्या तब्बल 7,000 कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार असून त्यांचं प्रमोशन करण्यात येणार आहे. यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आनंदाची बातमी मिळाली आहे.
विप्रोने ई-मेलच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या या जीवघेण्या काळात सर्व कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केलं आहे. त्यांनी या कठीण काळातही खूप मेहनत केली. त्यामुळे बँड बी 3 मध्ये मोडणाऱ्या आणि त्यापेक्षा कमी बँडमध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2021पासून वेतन वृद्धि सुविधादेखील सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींची पगार कपात करण्यात आली. पण अशात आता सगळं सुरळित होत असताना कर्मचाऱ्यांसाठीही चांगल्या संधी समोर येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना नेत्यांची राम मंदिरावरील विधाने दुदैर्वी : प्रविण दरेकर
- कोल्हार येथे नदीवरील पुलाच्या पोहोचमार्ग दुरुस्ती कामावेळी वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात येणार
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा, पक्ष सर्व मदत करेल : अस्लम शेख
- काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करणार : बाळासाहेब थोरात


