🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची गाडी फोडली आहे. त्यांच्या गाडीने एका तरुणाला धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त जमावाने सावंत यांची गाडी फोडली आहे.
बार्शी शहरातील बार्शी-लातूर बायपास रोडवरील BIT कॉलेजनजीकच्या शेळगाव फाटयाजवळ तानाजी सावंत यांच्या फॉर्चुनर गाडीने स्पेलंडर NXG MH13AQ 2782 या गाडीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात शामकुमार देविदास व्हळे (वय 40 )राहणार व्हळे शेलगाव हे जागीच ठार झाले. मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जमावाकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बार्शीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178541711980548097?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178541178838376448?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178538296072228864?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
