🕒 1 min read
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे. या ठिकाणी आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी मेळघाटात लवकरच नव्याने रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अमरावतीत केली आहे. कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्री अमरावतीत आले असता त्यांनी अमरावती जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय बघता ऑक्सिजनचे टॅंक वाढून देऊ असेही त्यांनी सांगितले. तर ऍडव्हान्समध्ये पैसे घेणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. अमरावतीतील विभागीय क्रीडा संकुलामध्ये जम्बो 400 बेडचे कोविड सेंटर उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/979994915796874/
महत्वाच्या बातम्या :
- अहमदनगरमध्ये रुग्णांना बेड मिळेना; जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 हजारांवर
- प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज कैकाडी यांच्या निधनाने नगरवर शोककळा
- अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी प्रशांत गडाख यांच्या प्रयत्नाने नेवासा तालुक्यासाठी दोन केंद्र
- नगरमध्ये डाव्या पक्षांच्यावतीने शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाचा निषेध
- नगरमधील भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात- संग्राम जगताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
