Share

जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले, काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Published On: 

जायकवाडी: पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः भंडारदरा, गंगापूर, दारणा आणि त्रंबकेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणं पुर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे 27 म्हणजेच सगळे दरवाजे उघड्यात आलेले आहेत. आता हे OverFlow पाणी खाली माजलगाव धरणाच्या दिशेने सोडण्यात आले आहे. धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने व मुळा धरणातून वीस हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर, गुरुवारी रात्री जायकवाडी धरणातून ९४ हजार क्यूसेक प्रमाणे पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले.

धरणातून रात्रीच्या वेळी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने, घाबरलेल्या शहर व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.जायकवाडी धरणात जवळपास शंभर टक्के पाणीसाठा जमा झाल्यावर, पाच सप्टेंबरपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. १३ सप्टेंबरला धरणातून केला जाणारा विसर्ग ४७ हजार क्यूसेक पर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाल्यावर, धरणातून केला जाणारा विसर्ग टप्प्याटप्पाने कमी करून दोन हजार क्यूसेक करण्यात आला होता.

दरम्यान, मागच्या दोन दिवसापासून धरणाच्या उर्ध्व भागात व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर, गुरुवारी रात्री जायकवाडी धरणातून केला जाणार विसर्ग प्रत्येक तासाला वाढवून तो ९४३२० क्यूसेक करण्यात आला. सध्या धरणाचे अठरा दरवाजे चार फूट व आपातकालीन नऊ दरवाजे एक फूट वर करून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणात ५३४२० क्यूसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू असून धरणात ९९.४४ टक्के पाणीसाठा जमा झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!