Share

बुलढाण्यात कोरोनाग्रस्तांना मिळतेय का चांगले जेवण, पालकमंत्र्यांनी केली पाहणी

Published On: 

बुलढाणा : कोविड रुग्णालयात कोरोना रुगांना देण्यात येणार जेवण व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आज जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन जेवणाचा दर्जा तपासाला व जेवणाचा दर्जा कसलीही तडजोड करू नये अन्यथा कडक कारवाही करू असा इशारा संबधित ठेकेदार व अधिकारी यांना दिला.

यावेळी त्यांनी कोविड रुग्णालयात तयार करण्यात येत असलेल्या लॅबची देखील पाहणी केली. या लॅबचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबद्दल तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. परंतु आता या लॅब करिता लागणारी सर्व साधनसामग्री उपलब्ध झाल्याने येत्या चार दिवसात या लॅबचे काम पूर्ण करून ही लॅब कार्यान्वित करावी अन्यथा पाचवा दिवस माझा असेल अशा इशारा संबंधित अधिकार्‍यांना पालकमंत्री महोदयांनी दिला. यावेळी त्यांच्या बरोबर बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!