अहमदनगर: गेल्या काही दिसांपासून राज्यातील काही भागात लंपी स्किन या जनावरांतील आजाराचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पशुपालकांमधे घबराट निर्माण झाली आहे. अगोदरच कोरोनामुळे शेतीमालाला तसेच दुधाला भाव मिळत नाही त्यात हे लंपि आजाराचे नवीन संकट निर्माण झाले आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन युवक क्रांती दलाच्या वतीने तालुका पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आजारावर शेळी वर्गातील देवीची लस उपयोगी असल्याचे मत आहे.
लंम्पी आजाराबाबत जनावरांचे मोफत लसीकरण करण्याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना @Yukrandofficial च्या निवेदन देण्यात आले आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याशी चर्चा केली आहे. @SunilKedar1111 pic.twitter.com/HxSQFncZZw
— कमलाकर शेटे – Kamalakar Shete ???????? (@Kamalakar_Shete) September 18, 2020
त्या दृष्टीने तालुक्यातील जनावरांना तातडीने आणि मोफत लसीकरण करावे अशी मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली. याचसंदर्भात गट विकास अधिकारी श्री. अमोल जाधव यांच्याशीही चर्चा करण्यात आली. त्यांनी या संदर्भात मदत करण्याचें आश्वासन दिले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी लवकरच लसीकरण करू असे सांगितले. यावेळी युक्रांदचे राज्य सहकार्यवाह अप्पा अनारसे, पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे, राशीन शहराध्यक्ष विनोद सोनवणे , सागर जाधव, दादा राऊत, योगेश लोंढे, रवळगाव युक्रांदचे रवी गोरे, ऋषिकेश आडागळे, मिरजगाव चे सलीम आतार उपस्थित होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी युक्रांदने कांद्यावर लागलेल्या निर्यातबंदीवरही आंदोलन केले होते.गेल्या जून महिन्यात मोठ्या तुताऱ्या वाजवत केंद्र सरकारने कांदे, बटाटे यासह पाच प्रकारचे शेतमाल आवश्यक वस्तू कायद्यातून वगळले असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी कारण दिले होते की, शेतकऱ्यांना चार पैसे मिळायला लागले की हा कायदा आडवा येतो त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आवश्यक वस्तू कायद्यात बदल केला आहे. हा क्रांतिकारी निर्णय आहे हे स्वतःच केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी जाहिर केले होते.
महत्वाच्या बातम्या :
- बेरोजगारीवर का बोलत नाही?; वर्षा गायकवाड नवनीत रणांवर भडकल्या
- ‘द आंत्रप्रन्योर’ : उद्योजक होण्यासाठीचा व्यावहारिक आणि वास्तववादी रोडमॅप
- अमली पदार्थ प्रकरणात या अभिनेत्रींचाही समावेश घेतली हायकोर्टात धाव…
- राहत्यामध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक; भगवान शंकराचा मुकूट बनवून देणार मुस्लिम समाजाचे तरुण!
- बुलढाण्यात कोरोनाग्रस्तांना मिळतेय का चांगले जेवण, पालकमंत्र्यांनी केली पाहणी


