🕒 1 min read
मुंबई: पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचारादरम्यान पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. बाबासाहेबांच्या निधनानंतर सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही. काही लिखाणावर आक्षेप होता. ब. मो. पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे) यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. अनेकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वैचारिक पातळीवर उघडपणे विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन पुरंदरेंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलंय.
माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही काही लिखाणावर आक्षेप होता
ब.मो.पुरंदरे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली …— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 15, 2021
पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला. मोठी कामगिरी करत आयुष्य खर्च केल्यानंतर काही लोक त्यामध्ये उणिवा काढत असतात, हे बाबासाहेबांच्या बाबतीतही केले गेले. इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याचं योगदान मात्र विसरता येणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, आलियाच्या चाहत्यांचा हिरमोड
- ‘साखर सम्राटला बदनामीचा शिक्का लागतो तसा शिक्का शिक्षण सम्राटला लागणं योग्य नाही’
- विद्यार्थ्यांच्या हिताला आमचे प्राधान्य-उदय सामंत
- धमकी देऊन न्याय मिळत नाही, हायकोर्टात आपली बाजू मांडावी- अनिल परब
- …काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा- पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
