🕒 1 min read
मुंबई : दाक्षिणात्य प्रसिध्द दिग्दर्शक राजामौली आणि बॉलीवूडचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटातील संघर्ष आता पहायला मिळत आहे. या दोन्ही चित्रपटात दोन कलाकार कॉमन असून अजय देवगण आणि आलिया भट्ट या दोन्ही चित्रपटात दिसणार आहेत. आलिया लवकरच प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ झळकणार आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यामुळे आलियाच्या चाहत्यांचे हिरमोड झाल्याने आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातून आलिया भट्ट तेलुगू चित्रपटसृष्टीत डेब्यू करत आहे. मात्र आलियाचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून दोन्ही चित्रपट ६ आणि ७ जानेवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होते, मात्र आता संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.
https://www.instagram.com/p/CWSaiTyMLAU/?utm_source=ig_web_copy_link
संजय लीला भन्साळी यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. नुकतंच आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर याबाबतची घोषणा केली आहे. याबाबतचा एक फोटो तिने पोस्ट केला आहे. “आम्हाला सांगण्यात फार आनंद होतोय की, संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी आणि डॉ. जयंतीलाल गडा पेन स्टुडिओ द्वारे निर्मित चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ ला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे,” असे तिने यात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धमकी देऊन न्याय मिळत नाही, हायकोर्टात आपली बाजू मांडावी- अनिल परब
- …काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा- पृथ्वीराज चव्हाण
- ‘हौंसला रख’ च्या प्रमोशनवेळी शेहनाजने सिद्धार्थच्या आठवणीत ढाळले अश्रू
- छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र बाबासाहेब पुरंदरेंनी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवले -खा. रावसाहेब दानवे
- ‘महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या विकासाची स्थिती’; १८ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत विशेष परिषद!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
