🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपन खेर हे त्यांच्या अभिनयासाठी सर्वदुर प्रसिद्ध आहे. बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही त्यांनी आभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयाव्यतीरिक्त ते वैयक्तीक जीवनात परखड मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. अनुपम खेर नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असतात. विविध मुद्यांबाबत ते सोशल मीडिया द्वारे देखील व्यक्त होत असतात.
नुकताच अनुपम खेर यांनी ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला असून चाहत्यांना त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. अनुपम यांनी त्यांच्या एका चित्रपटातील लूक पोस्ट केला आहे. या पोस्टवर त्यांनी ‘सिनेमाचं नाव ओळखा पाहू?’असं विचारले आहे. अनुपम खेर यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर लाइक्स आणि कमेंन्टसचा वर्षाव होत आहेत.
Ab ki baar petrol ⛽️ 100 paar
— Sab Changa Si (@SabChangaSi) July 3, 2021
हा फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट करण्यास सुरवात केली. यावर एका नेटकऱ्याने म्हंटले की, ‘या सगळ्यात आम्हाला काही रस नाही. आम्हाला पेट्रोल, डिझेल, यांच्या दरवाढीवर तुमच्या प्रतिक्रिया हव्या आहेत.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला,’ ‘अबकी बार पेट्रोल १०० बार’. असे कमेंट करत लोक अनुपम खेर यांनाच प्रश्न करत होती. अनुपम खेर यांचा हा लूक त्यांचा २००३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘स्पेशल २६’ मधला आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी अनुपम खेर यांचा हा एक उत्तम चित्रपट असल्याचे देखील म्हंटले आहे.
We don't have any intrest in all this sir, we just want to know now what will be ur stand about high rise of Petrol, Diesle and LPG. In only National interest????????
— Vivek Laata (@VIKISHARMA1983) July 3, 2021
अनुपम खेर यांची सिनेसृष्टीत एक उत्तम कलाकार म्हणून ओळख आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अनुपम खेर यांना न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मसाठी त्यांना ‘बेस्ट अॅक्टर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अनुपम खेर आणि आहना कुमरा मुख्य भूमिकेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतीय संघ इंग्लंडमध्ये यशस्वी होईल’, चॅपेलनी व्यक्त केला विश्वास
- अतीउत्साह नडला अंगी! ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्तिकला मागावी लागली माफी
- अतीउत्साह नडला अंगी! ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्तिकला मागावी लागली माफी
- डेल्टा प्लस चा जिल्ह्यात एकही रुग्ण नसताना बाजारपेठेवर वेळेचा निर्बंध का?? जिल्हा व्यापारी महासंघाचा आक्षेप
- …तरीही शिखर धवनला संधी नाहीच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
