🕒 1 min read
मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात आहे. मात्र या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घटनेसंबंधी शंकेला अनेक पुरावे समोर आल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं होत.
याच सर्व पार्श्वभूमीवर मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं.
महत्त्वाच्या बातम्या
- मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
- बीडमध्ये खळबळ! नवोदय विद्यालयातील २० जणांना कोरोना
- ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केल्याने महिलेचा विनयभंग
- अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र सभा घेण्याच्या परंपरेला छेद
- लवकरच ग्रामीण भागातही सुसाट धावणार स्मार्ट सिटी बस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
