Share

बीडमध्ये खळबळ! नवोदय विद्यालयातील २० जणांना कोरोना

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याकरिता प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्यात. मात्र, एक चिंता निर्माण करणारी गोष्ट समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षकांसह काही विद्यार्थी असे एकूण २० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विद्यालयातील एका सहशिक्षकाला कोरोना झाला होता. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यातून तब्बल १४ विद्यार्थी व काही शिक्षक कोरोनाबाधित झाल्याचे समोर आल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता कोरोनाचे हॉटस्पॉट होताना दिसत आहेत. राज्याच्या अनेक भागात निवासी शाळां आणि वस्तीगृहांमधून विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र असतानाच आता गढी येथील नवोदय विद्यालयात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी येथील विद्यार्थ्यांची अँटीजन तपासणी करण्यात आली, यात २० जण कोरोनाबाधित सापडल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले.

सदर विद्यालयाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!